अलिबाग : प्रतिनिधी
रोट्रॅक्ट क्लब ऑफ अलिबाग सीशोअरच्या माध्यमातून नवीन वर्षाचे स्वागत स्वच्छता मोहिम राबवित केली. या वेळी त्यांनी अलिबाग समुद्रकिनारी क्रीडाभुवन येथे कचरा गोळा करुन नगरपालिकेच्या स्वच्छता आणि आरोग्य विभागाकडे सुपूर्द केला
अलिबाग शहरातील रोट्रॅक्ट क्लब ऑफ अलिबाग सीशोअरच्या माध्यमातून शनिवारी नवीन वर्षाची सुरवात स्वच्छता मोहिमेतून करायचा निर्धार डॉ. शिवपाल तिवारी यांच्या संकल्पनेतुन या मोहिमेचा शुभारंभ अलिबाग समुद्रकिनार्यारील क्रीडाभुवन येथील स्वच्छता करून नवीन वर्षाची सुरुवात करण्यात आली.
या वेळी रोट्रॅक्टर तन्वी शेटये हिने सूत्रसंचलन केले. डॉ. तिवारी आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ राजेंद्र चांदोरकर यांनी स्वच्छतेबद्दल् थोडक्यात माहिती दिली. रोट्रॅक्टर प्रतिक पाटील याने उपस्थितांचे आभार मानले. या स्वछतेसाठी रोट्रॅक्ट अंकुश पाटील, कुमार जोगळेकर, सिंपल सहानी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेहारिका घोसाळकर, ओंकार घोसाळकर, संतोष कांबळेकर, तेजस पानकर, प्रीती वंजारी, विद्या साळुंके, रुपेश कवळे, अंकुष साळवी, हर्षवर्धन पाटील यांनी विशेष मेहनत घेतली व हा कार्यक्रम यशस्वीरित्या झाला.