Breaking News

खराब हवामानामुळे मच्छीमारही हतबल

मुरूड : प्रतिनिधी
वादळी पावसामुळे एकीकडे शेतकरी हवालदिल झाला असताना या खराब हवामानाचा फटका मच्छीमारांनाही बसला असून, मिळकत तुटपूंजी आणि खर्चाचा वाढता बोजा यामुळे बोटी किनार्‍यावर शाकारण्यावाचून कोळी बांधवांना दुसरा पर्याय राहिलेला नाही.
कोकणातील रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. जिल्ह्यात सुमारे 25 हजार छोट्या-मोठ्या मच्छीमार बोटी असून, जवळपास अडीच लाख लोक या व्यवसायावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात, मात्र हा व्यवसाय सन 2019पासून सतत कूस बदलणार्‍या हवामानाच्या दृष्टचक्रात अडकल्याने मच्छीमार पुरते हैराण झाले आहेत.
यंदा तर आधी कोरोना, नंतर निसर्ग चक्रीवादळ आणि आता परतीचा वादळी पाऊस यामुळे मासळी पकडण्यासाठी खर्च मोठा होत असून, मिळकत मात्र तुटपुंजी झाल्याने बोटमालक दिवसागणिक कर्जबाजारी होत आहेत. त्यांना शासनाकडून मदत वा डिझेलचा परतावाही मिळत नसल्याने कर्जाचा बोजा वाढतच चालला आहे. याकडे राज्य शासनाने लक्ष देऊन आर्थिकदृष्ट्या दिलासा द्यावा, अशी मागणी मच्छीमार करीत आहेत.

Check Also

पनवेल रेल्वेस्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल रेल्वेस्थानक परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे …

Leave a Reply