पनवेल : रामप्रहर वृत्त
आंतरविद्यापीठ युवा राष्ट्रीय महोत्सव या स्पर्धेचे आयोजन असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजतर्फे दरवर्षी करण्यात येते. यंदा राष्ट्रीय स्तरावरची ही स्पर्धा पंजाबच्या लुधियाना येथील अॅग्रीकल्चरल युनिव्हर्सिटीमध्ये नुकतीच झाली. या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या पनवेल खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालयाचा विद्यार्थी परिण मोरे (एमए अर्थशास्त्र) याने मुंबई विद्यापीठातर्फे सहभाग घेत एकांकिकेत सुवर्णपदक पटकाविले. त्याने मुंबई विद्यापीठाचे व सीकेटी महाविद्यालयाचे नाव राष्ट्रीय स्तरावर चमकवले आहे.
आंतरविद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये गेली चारही वर्ष सीकेटी महाविद्यालयाचे विद्यार्थी मुंबई विद्यापीठातर्फे सहभाग घेत आहेत. 2019-20मध्ये प्रतिकेश मोरे याने या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन राष्ट्रीय स्तरावर दोन रौप्यपदके, तर 2022-23 या वर्षी शिरीष म्हात्रे व राहुल तायडे या दोन विद्यार्थ्यांनी या रौप्यपदक प्राप्त केले होते. यंदा परिण मोरेने सुवर्णपदक जिंकले.
या सुवर्ण यशाबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, सचिव डॉ.एस.टी. गडदे यांनी परिण मोरे व महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कक्षाचे कौतुक केले. या वेळी माजी नगरसेवक अॅड.मनोज भुजबळ, अर्चना ठाकूर, गणेश जगताप आदी उपस्थित होते. दरम्यान, आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनीही परिणसह टीमचे अभिनंदन केले आहे.
Check Also
पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच
सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …