Breaking News

भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकार्‍यांची नियुक्ती

लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा

पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्ष राजश्री वावेकर यांनी प्रभाग क्रमांक 19मधील महिला पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पनवेल भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात प्रभाग 19च्या नवनियुक्त महिला पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यामध्ये अध्यक्षपदी सपना पाटील, उपाध्यक्षपदी कविता पाटील, सुवर्णा मार्गी, अरुणा पाटील, सरचिटणीसपदी स्नेहल खरे, चिटणीसपदी निकिता पाटील, आशा तलोजकर, जयश्री कामरकर, खजिनदारपदी करुणा कानुगोजे, सोशल मीडिया प्रमुखपदी भारती एकलहरे, तर सदस्य म्हणून अंजू कोळी, सुवर्णा पाटकर, सुमन भालेराव, वृषाली चौधरी, मीनाश्री गीते यांचा समावेश आहे.
सर्व पदाधिकार्‍यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांची गुरुवारी भेट घेतली. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. या वेळी माजी नगरसेविका दर्शना भोईर उपस्थित होत्या.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply