Breaking News

खासदार डॉ. सुजय विखे-पाटील रविवारी कामोठ्यात

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त
महायुतीचे नगर दक्षिणचे उमेदवार डॉ.सुजय विखे-पाटील यांना बहुमताने विजयी करण्यासाठी पनवेलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि.7) सायंकाळी 5 वाजता कामोठ्यातील नालंदा बुद्ध विहार मैदानावर पनवेल, नवी मुंबई आणि मुंबईस्थित पारनेरकरवासीयांचा परिवार संवाद भव्य मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रमुख निमंत्रक विजय औटी यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीसाठी नगर दक्षिण मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान खासदार डॉ.सुजय विखे-पाटील पुन्हा एकदा मैदानात आहेत, तर महाविकास आघाडीकडून माजी आमदार निलेश लंके यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. खासदार सुजय विखे हे आपण पाच वर्षांत केलेली विविध कामे, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या 10 वर्षांतील देश उभारणीसाठी झालेली महत्त्वाची पायाभरणी, देशाची आधुनिकतेकडे सुरू असलेली वाटचाल या मुद्द्यांवर मते मागत आहेत. दुसरीकडे नवी मुंबईतील पारनेरकरवासीयांच्या एकजुटीचा तत्कालीन आमदार निलेश लंके यांनी राजकारणात शिताफीने वापर केला, मात्र निवडून आल्यानंतर लंके यांनी पारनेरकर परिवाराची वेळोवेळी मानहानी केली. त्यांच्या दुखावलेल्या भावना, आमदारकीचा निकाल देणार्‍या नवी मुंबई, मुंबईस्थित पारनेरकर परिवाराला झालेला शून्य फायदा, आमदार झाल्यानंतर बदलले रंग यामुळे सर्व पारनेरकरांनी त्यांना राजकारणातूनच दूर करायचे असा विचार केला आहे. त्या अनुषंगाने या परिवार मेळाव्याचे आयोजन करून करण्यात आले असल्याचे विजुभाऊ औटी मित्र परिवाराने म्हटले आहे.
परिवार संवाद मेळावा यशस्वी करण्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्ष, तसेच विजुभाऊ औटी मित्र परिवार, कामोठे रहिवासी सांस्कृतिक युवा मित्र मंडळ, संदीप पाटील वराळ जनसेवा फाऊंडेशन, सर्व पारनेरकरवासीय काम करीत आहेत.

Check Also

पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …

Leave a Reply