Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र राज्य परिषदेच्या शिष्यवृत्ती परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या  कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. याबद्दल संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
विद्यालयाच्या 10 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. यामध्ये इयत्ता आठवीतील कार्तिक साईनाथ दहिफळे, सुकन्या रवीकिरण पायघन, रविराज महेश भोसले, यश रामचंद्र शिंगाडे, दुर्वेश सूर्यकांत मोरे व सर्वेश मधुकर देसाई, तर पाचवीतील वेदांत कृष्णा कडू, राहुल सत्यवान बांगर, मयुरेश संतोष माने व स्वरा सुनील पाटील यांचा समावेश आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कौतुक केले. या वेळी इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे, हेड क्लर्क प्रियांका बांगर, पब्लिक स्कूल (सीबीएसई बोर्ड)चे प्राचार्य अविनाश कुलकर्णी उपस्थित होते.
दरम्यान, विद्यालयाचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर तसेच पर्यवेक्षिका कुसुम प्रजापती, सारिका लांजुडकर, नेहा खन्ना तसेच शिक्षकवृंदानेही या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

सीकेटी विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन …

Leave a Reply