नवी मुंबई : बातमीदार
गेल्या दोन महिन्यांपासून नवी मुंबई मनपा हद्दीत 1500 पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह गरोदर मातांचाही समावेश आहे. परंतु या गरोदर मातांचे बाळंतपण व्यवस्थित व सुखरूप करून त्यांना यशस्वीपणे घरी सोडून देण्यात आले आहे. यामुळे वाशी कोविड 19 रुग्णालयातील भूल विभागाचे डॉक्टर अभिनंदनास पत्र ठरले आहे.
कोरोना आजार घातकच हे सर्वांना माहिती आहेच! परंतु गरोदर अवस्थेत कोरोना संसर्ग होणे म्हणजे मृत्यू व जीवन या मध्ये राहिलेले किंचितसे अंतर. परंतु याचे आवाहन कोविड रुग्णालयाच्या भूल व स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांनी स्वीकारून नवी मुंबई मधील बेलापूर ते दिघा दरम्यानच्या दहा महिलांच्या गरोदरपणाचे नऊ महिने संपल्यानंतर सीझर करून घरी पाठवले आहे.
मार्च महिन्याच्या शेवटी घणसोली सेक्टर 9 मधील नऊ महिन्याची गरोदर असलेल्या महिलेला कोरोणाची लागण झाली.त्यावेळी मोठी खळबळ माजली होती. त्या महिलेला वाशी कोविड रुग्णालयात आणल्यानंतर तिचे सीझर करण्यात आले. पहिलाच असा अनुभव असलेल्या भूल तज्ञ विभागाने यशस्वी भूल देऊन त्या महिलेला बाहेर काढले. त्यानंतर नऊ महिलांना देखील अशाच प्रकारे शास्रक्रिया करून यश प्राप्त केले. त्यानंतर न्यायवैद्यक शास्त्र गरोदर माता व अर्भकावर योग्य ते उपचार करून कोरोनाला हरवले. यामुळे कोविड रुग्णालयाचे डॉक्टर कौतुकास पात्र ठरले आहेत.