Breaking News

रायगड जिल्ह्यात प्रथमच 1111 फुट तिरंगा पदयात्रा

खारघरमध्ये भव्य दिव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने खारघरमध्ये भव्य दिव्य 1111 फुट तिरंगा पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यात प्रथमच सर्वात मोठी ही तिरंगा पदयात्रा असणार आहे.
विकसित भारतावर लक्ष केंद्रित करून आपला देश 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. देशभरात 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा अभियान राबवले जात आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वज तिरंगा फडकवावा, यानिमित्ताने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान आणि योगदान देणार्‍या ज्ञात-अज्ञात सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण व्हावे या हेतूने सदर अभियान राबवले जात असून स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता खारघरमधील सेक्टर 19 येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल ते उत्सव चौक अशा मार्गाने या भव्य दिव्य तिरंगा यात्रेला प्रारंभ होणार आहे.
या तिरंगा पदयात्रेत अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून अविस्मरणीय अनुभव आणि देशभक्तीच्या उत्सवात नागिरकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले आहे.

Check Also

कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड

जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …

Leave a Reply