पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी गेली 15 वर्ष आपल्या मतदारसंघात विकासाचा झंजावात सुरू ठेवला आणि याच विकासावर प्रभावित होऊन शिवसेना उद्धव ठाकरे गटातील पदाधिकार्यांनी रविवारी (दि.27) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील जिल्हा महिला संघटक कल्पना पाटील, युवा अध्यक्ष सतीश पाटील, महादेव पाटील, रंजना पाटील, चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत
प्रवेश केला.
या पक्षप्रवेश सोहळ्याला माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, नीता माळी, पनवेल तालुका महिला अध्यक्ष कमला देशेकर, माजी नगरसेवक अजय बहिरा, रघुनाथ बहिरा, शक्ती केंद्रप्रमुख बाळाराम चिखलेकर यांच्यासह मान्यवर
उपस्थित होते.
Check Also
वडापाव दिवस २३ ऑगस्ट; सिनेमाच्या जगातही भारी टेस्टी!
वडापाव असं म्हणताक्षणीच तुम्हा प्रत्येकाच्या जीभेवर म्हणा, डोळ्यासमोर म्हणा, आठवणीत म्हणा त्याची चव आलीच असणार. …
RamPrahar – The Panvel Daily Paper