Breaking News

पेणमध्ये आज आमदार रविशेठ पाटील यांचे शक्तीप्रदर्शन

पेण ः प्रतिनिधी
विधानसभेची लगबग सर्वत्र सुरू आहे. पेण मतदारसंघातून भाजपचे माजी मंत्री आमदार रविशेठ पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली असून ते सोमवारी (दि.28) आपला उमेदवारी अर्ज भरून महायुतीचे शक्तीप्रदर्शन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. खासदार धैर्यशील पाटील, माजी जि. प. अध्यक्ष निलिमा पाटील यांनी सुधागड आणि पेण विभागात कंबर कसली आहे, तर हमरापूर, वाशी, वडखळ, कासू विभागात जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, अनिरुद्ध पाटील, ललीत पाटील, कौशल्या पाटील आणि पेण शहरात प्रितम पाटील यांनी बैठकांचे सत्र सुरू केले आहे. पेण विधानसभा मतदारसंघात खासदार सुनील तटकरे, खासदार धैर्यशील पाटील आणि आमदार रविशेठ पाटील या तीन शक्ती एकत्र आल्याने विरोधकांनी मोठा धसका घेतल्याचे युवा तालुकाध्यक्ष स्वप्निल म्हात्रे यांनी सांगितले. पेण शहरात भाजप कार्यालयापासून एसटी स्टँड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुढे महावीर मार्ग, खाटीक मोहल्ला, पंका पाटील चौकातून अंतोरा रोडला मोठ्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply