Breaking News

माथेरान रेल्वेला विस्टाडोम बोगी

कर्जत : देशी-विदेशी पर्यटकांची आवडती असलेली माथेरानची राणी आता नव्या डौलात धावताना दिसणार आहे. या मिनीट्रेनमध्ये विस्टाडोम कोचचा समावेश केल्याने पर्यटकांचा प्रवास रंजक होणार आहे. 1907 साली सुरू झालेल्या मिनीट्रेनमध्ये अनेक आमूलाग्र बदल होत गेले. त्या काळी रेल्वेचे मोठे अधिकारी किंवा इंग्रजांना घेऊन मोटार रेल्वे अस्तित्वात होती. कालांतराने बदल होत गेले. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्यासोबत विस्टाडोमबाबत सकारात्मक चर्चा केल्याचे रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंग यांनी सांगितले.विस्टाडोमचे डबे जोडलेली गाडी 23 फेब्रुवारी रोजी नेरळ येथे सर्व पर्यटक, प्रवासी यांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे. लवकरच ती पर्यटकांच्या सेवेत दाखल होईल. पर्यटक व प्रवासी यांना 21 किमी अंतराच्या मिनीट्रेनमधील प्रवासातून निसर्गाचा मनमुराद आनंद घेता यावा यासाठी विस्टाडोम कोचची निर्मिती करण्यात आली आहे. पारदर्शक काचा असलेल्या मोठ्या खिडक्या याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. सध्या कोकणात धावणार्‍या गाड्यांनाही या बोगी लावण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवासात नवी रंगत येणार आहे.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply