Breaking News

कर्जतचे प्रसादबुवा पाटील यांचा समाजरत्न पुरस्काराने सन्मान

कर्जत : बातमीदार

भजनभूषण गजाननबुवा पाटील यांचे चिरंजीव आणि देशविदेशात भजनाचे कार्यक्रम करणारे प्रसादबुवा पाटील यांना नवी मुंबई येथील अँटी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडिया या संस्थेने राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

कै. गजाननबुवा पाटील यांचा भजन गायनाचा वारसा प्रसादबुवा पाटील समर्थपणे जपत असून, प्रसादबुवा यांनी स्वतः अनेक ओव्या रचल्या आहेत. भजनाचे देशाबाहेर कार्यक्रम करणारे म्हणून प्रसादबुवा यांचा लौकिक असून त्यांच्याकडे भजनाचे धडे गिरवण्यासाठी तरुणवर्ग मोठ्या प्रमाणावर येत असतो. प्रसादबुवा पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन नवी मुंबई येथील अ‍ॅण्टी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडिया या संस्थेने त्यांची राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कारासाठी निवड केली.

नव्या मुंबईतील वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रसादबुवा पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी अभिनेते बाबा करडे, फाऊंडेशनचे अध्यक्ष देवेंद्र सरदार, मिस्टर युनिव्हर्स सिमरन आहुजा या पाहुण्यांसह प्रसादबुवा पाटील यांच्या पत्नी प्राची पाटील, तसेच पौर्णिमा पेडणेकर, मधुकर पाटील, केशव पवार आणि प्रसन्न पाटील उपस्थित होते.

Check Also

उलवे नोड सी-फूड फेस्टिव्हलचे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

उलवे नोड ः रामप्रहर वृत्तराज्यातील मत्स्य व्यवसायामध्ये मोठी क्षमता असून त्यासाठी बजेट वाढवून विकासाला गती …

Leave a Reply