उरण : रामप्रहर वृत्त
आधुनिकीकरणाच्या या युगात विज्ञानाची कास धरणे अत्यंत महत्त्वाचे आणि गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 52व्या उरण तालुका विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी केले.
उरण पंचायत समिती शिक्षण विभाग आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे द्रोणागिरी येथील श्रीमती भागुबाई चांगू ठाकूर विद्यालयाच्या वतीने 52व्या उरण तालुका विज्ञान प्रदर्शन 2024-25चे आयोजन विद्यालयात करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. 3) झाले.
या प्रदर्शनानिमित्त उरण तालुक्यातील अनेक शासकीय तसेच निमशासकीय विद्यालयांनी सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना तसेच विज्ञान व तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले.
उद्घाटन समारंभाला भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उरण पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी प्रियांका म्हात्रे, सहाय्यक गटशिक्षण अधिकारी संतोषसिंग डाबेराव, केंद्र प्रमुख गोपाळ जाधव, निर्मला घरत, शंकर म्हात्रे, बबन पाटील, विद्यालयाचे चेअरमन चंद्रकांत घरत, माजी जि.प. सदस्य जीवन गावंड, कमिटी मेंबर शेखर तांडेल, नरेश मोकाशी, विकास पाटील, प्रितम वर्तक, बळीराम पाटील यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. या सोहळ्यानिमित्त मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत कार्यक्रमाचे कौतुक केले.
Check Also
‘सामना’ पन्नाशीचा झाला…
काही कलाकृतींचे महत्त्व व अस्तित्व हे कायमच अधोरेखित होत असते. ते चित्रपटगृहातून उतरले तरी त्यांचा …