अलिबाग : प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात अंदाजे 500 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. प्राप्त निधीपैकी 242 कोटी 84 लाख रुपये घरांसाठी देण्यात येणार आहेत, अशी माहिती शुक्रवारी (दि. 19) झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
रायगडात 3 जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. या वादळामुळे झालेले नुकसान व प्रशासन करीत असलेल्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आढावा बैठक झाली. या बैठकीस पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, अपर जिल्हाधिकारी भारत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती, सर्जेराव मस्के पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक पांडुरंग शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक आदी उपस्थित होते.
चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक रायगडच्या दौर्यावर आले होते. त्यांचा अहवाल केंद्राकडे जाईल. त्यानंतर केंद्राची मदत राज्याला मिळेल, असे या वेळी सांगण्यात आले.
Check Also
शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित
पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …