पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवीन पनवेल उपशहरप्रमुख ज्ञानेश्वर भंडारी यांनी त्यांच्या समर्थकांसह शुक्रवारी (दि. 3) भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे नवीन पनवेल विभागात शिवसेना ‘उबाठा’ला मोठा धक्का बसला आहे.
पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात आमदार प्रशांत ठाकूर व भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, माजी सरपंच महादू शेळके, पद्माकर शेळके, मंगेश भोपी, राजेश काकडे, भाई पाटील, आकाश मोकल, विष्णू मोकल, निलेश पाटील, सचिन काकडे, अनिल शेळके, रोहित पाटील, गजानन शेळके, सत्यवान खांडे, श्रीचंद भंडारी यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …