Breaking News

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घेतली शर्मा कुटुंबियांची भेट

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त
खारघरमध्ये दोन युवकांकडून हेल्मेटने झालेल्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेले शिवकुमार रोशनलाल शर्मा यांच्या कुटुंबियांची रविवारी (दि. 9) भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी वाशी येथे जाऊन भेट घेतली. त्याचबरोबर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत भूमिका स्पष्ट केली.
शिवकुमार शर्मा यांना दोन युवकांकडून हेल्मेटच्या सहाय्याने जबर मारहाण झाल्याची धक्कादायक घटना खारघरच्या उत्सव चौकात मागील रविवारी घडली होती. यात डोक्याला जबर दुखापत झाल्याने शर्मा यांचा मृत्यू झाला. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दोन्ही आरोपी खारघर येथे आयोजित इज्तेमा कार्यक्रमावरून आले असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रविवारी शर्मा कुटुंबियांची भेट घेतली. त्यांच्यासोबत भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, चिटणीस ब्रिजेश पटेल, संतोष शर्मा, शैलेंद्र त्रिपाठी, दिलीप जाधव, विपुल चौटालिया होते.
या वेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, आरोपींच्या मागे असलेली ताकद मोठी आहे. भररस्त्यात एखाद्याला मारण्याची यांची हिंमत कशी होते? बांगलादेशात जसे हिंदूंना मारले तसे शिवकुमार शर्मा यांना मारले गेले आहे. येत्या दोन दिवसांत आरोपींना पकडतो असे पोलिसांनी सांगितले आहे. तसे न झाल्यास वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी पाठवा, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करणार आहोत.

Check Also

नमो चषक कुस्त्यांच्या दंगलीत रुस्तम-ए-हिंद लाली गुरुदास पोल किताब विजेता

महाराष्ट्र चॅम्पियन अमेघा घरतची लक्षणीय कामगिरी पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे येथील …

Leave a Reply