Breaking News

शिवसेना नेते प्रकाश देसाई यांचा भाजपमध्ये प्रवेश

पाली ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य दिवसेंदिवस वाढत असून शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रकाश देसाई यांनी रविवारी (दि. 9) पाली येथे कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी संपूर्ण पाली भाजपमय झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
या कार्यक्रमास राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, विधान परिषद आमदार विक्रांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या वेळी शिवसेना नेते प्रकाश देसाई यांच्यासह परळी ग्रामपंचायतीच्या सरपंच साक्षी देसाई, उपसरपंच अलका देशमुख व सदस्य, घोटवडे सरपंच व सदस्य, नेनवली, राबगावसह अन्य ग्रामपंचायतींमधील कार्यकर्ते व ग्रामस्थांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्याचबरोबर माजी सभापती उज्वला देसाई, पिठू डुमना, पुष्पा डुमना, संजय परदेशी, सतीश देसाई, बापूराव देसाई व त्यांचे समर्थक तसेच विजयनगरमधील धर्मेंद्र आंदेकर, साईनाथ मित्र मंडळाचे कार्यकर्ते यांनीही विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले.
आपल्या भाषणात खासदार धैर्यशील पाटील यांनी भाजपची ताकद सातत्याने वाढत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन केले.
आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, प्रकाश देसाई व सहकार्‍यांनी भाजपच्या प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय घेतला ही निश्चितपणे चांगली बाब आहे. पक्षाच्या, शासनाच्या माध्यमातून विकासाची गंगा खेड्यापाड्यापर्यंत व शेवटच्या घटकापर्यंत पोहचत आहे, तर भाजप हा केवळ पक्ष नसून संस्कार असल्याची भावना आमदार विक्रांत पाटील यांनी व्यक्त केली. आमदार रविशेठ पाटील यांनीही देसाई यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आपल्या मनोगतात प्रकाश देसाई म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात सत्तास्थानी असलेल्या भाजपने विकासाचा रथ वेगाने पुढे नेला आहे. भाजप हा सर्व जाती, धर्म, पंथ यांना सोबत घेऊन जाणारा पक्ष असल्याने मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. भाजप नेत्या गीता पालरेचा, राजेश मपारा, आरिफ मणियार यांनीही विचार व्यक्त केले.
कार्यक्रमास भाजप जिल्हा उपाध्यक्ष आलाप मेहता, सुधागड तालुका अध्यक्ष श्रीकांत ठोंबरे, विठ्ठल सिंदकर, सुभाष पाटील, वैशाली मपारा, प्रणाली शेठ, सुशील शिंदे, भास्कर पार्टे, रमेश साळुंके, रोहन दगडे, नगरसेवक पराग मेहता, जुईली ठोंबरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

नमो चषक कुस्त्यांच्या दंगलीत रुस्तम-ए-हिंद लाली गुरुदास पोल किताब विजेता

महाराष्ट्र चॅम्पियन अमेघा घरतची लक्षणीय कामगिरी पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे येथील …

Leave a Reply