Breaking News

नमो चषक कुस्त्यांच्या दंगलीत रुस्तम-ए-हिंद लाली गुरुदास पोल किताब विजेता

महाराष्ट्र चॅम्पियन अमेघा घरतची लक्षणीय कामगिरी

पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे येथील विधानसभा मतदारसंघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कळंबोली येथे नमो चषक भव्य क्रीडा महोत्सव 2025 अंतर्गत भव्य दिव्य कुस्ती स्पर्धा रंगली. या स्पर्धेत रुस्तम-ए-हिंद लाली गुरुदास पोल (पंजाब) या पैलवानाने इराणचा आंतरराष्ट्रीय पैलवान जलाल इराणला चारीमुंड्या चीत करून किताब पटकावला.
लाली गुरुदास पोलला पाच लाख रुपये व मानाची गदा देऊन पनवेल विधानसभेचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेला प्रमुख मान्यवर म्हणून युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, नमो चषकचे मुख्य आयोजक व पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची विशेष उपस्थिती लाभली.
या सामन्यांसाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, स्थायी समितीचे माजी सभापती व स्पर्धा संयोजक अमर पाटील, भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी नगरसेवक राजू शर्मा, तेजस कांडपिळे, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, भाजप कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, शिवसेना शहरप्रमुख तुकाराम सरक, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, कळंबोली गुरुद्वारा अध्यक्ष नारिंदर सिंग भुल्लर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अमर ठाकूर, मनीषा निकम, पैलवान बबन पवार, रूपेश पावशे, योगेश लहाने, गौरव नाईक, देविदास खेडकर, क्रीडा प्रशिक्षक विनोद नाईक यांच्यासह कुस्तीप्रेमी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. या वेळी हलगीच्या नादात खेळाडू आणि मान्यवरांचे जल्लोषात स्वागत करण्यात येत होते. एकाहून एक रोमांचक सामने, भव्य दिव्य स्वरूपात आयोजन, प्रेक्षकांची तुफान गर्दी, खणखणीत आवाजात कुस्तींचे समालोचन यामुळे वातावरण उत्साहपूर्ण होते.
महिलांच्या गटात महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान अमेघा घरत (पनवेल) विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान अंकिता फातले (कोल्हापूर) यांचा खास आकर्षण सामना झाला. यामध्ये अमेघाने बाजी मारत 51 हजार रुपये व मानाची गदा पटकावली.
वरिष्ठ मुले 79 ते 125 किलो वजनाखालील गटात शुभम वरखडे याने श्रेयस करे याचा पराभव करून नमो केसरी मानाची गदा पटकावली. 70 ते 79 किलो वजनाखालील गटात प्रतीक हातमोडे प्रथम क्रमांक, विशाल पुजारी द्वितीय क्रमांक, 60 ते 70 किलो वजनाखालील गटात प्रथम क्रमांक किरण ढवळे, साजन पावशे द्वितीय क्रमांक, 50 ते 60 किलो वजनाखालील गटात प्रथम क्रमांक राज पाटील, द्वितीय क्रमांक सूरज झा, 70 किलो वजनाखालील गटात प्रथम क्रमांक सुदर्शन आसदर, वेदांत यलकर द्वितीय, 65 किलो वजनाखालील गटात भूषण पवार प्रथम क्रमांक, प्रीत भोईर द्वितीय, 60 किलो वजनाखालील गटात वेदांत पाटील प्रथम क्रमांक, द्वितीय रूद्र पाटील, 55 किलो वजनाखालील गटात प्रथम क्रमांक ओम म्हात्रे, सुमित वीरकर द्वितीय, 50 किलो वजनाखालील गटात प्रथम शुभम करांडे, द्वितीय अभिषेक साह, 45 किलो वजनाखालील गटात विश्वजीत घोगे प्रथम, सनी कुमार द्वितीय, 40 किलो वजनाखालील गटात प्रथम सुनील म्हात्रे, सोहम ढणे द्वितीय, 35 किलो वजनाखालील गटात तनिष्क पाटील प्रथम, व नितेश मंडळ याने द्वितीय क्रमांक पटकावला.
17 वर्षाखालील मुलांच्या 30 किलो वजनाखालील गटात प्रथम क्रमांक करण कातकरी, द्वितीय आशिषकुमार पाल याने प्राप्त केला. महिलांमध्ये 57 ते 76 किलो वजनाखालील गटात रितिका कारंडे हिचा पराभव करत अमेघा घरत हिने प्रथम क्रमांक पटकावून नमो केसरी मानाची गदा मिळवली. 50 किलो वजनाखालील गटात प्रथम क्रमांक शौर्या कोळेकर, द्वितीय श्रुती कोंडविलकर, 45 किलो वजनाखालील गटात प्रथम ईश्वरी गळवे तर द्वितीय साची महतो, 40 किलो वजनाखालील गटात निर्जला साही प्रथम, द्वितीय क्रमांक निलम कातकरी हिने मिळवला.
या स्पर्धेत महिलांच्या गटातील महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान अमेघा घरत हिने तीनही सामन्यात विशेष चमकदार कामगिरी केली. त्यामुळे ती या स्पर्धेतील लक्षणीय पैलवान ठरली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्थायी समितीचे माजी सभापती व स्पर्धा संयोजक अमर पाटील आणि सहकार्‍यांनी विशेष मेहनत घेतली.
यांनी गाजवली स्पर्धा
रुस्तम-ए-हिंद लाली लाली गुरुदास पोल हे पंजाबमधील एक नामांकित कुस्तीपटू आहेत. त्यांनी त्यांच्या उत्कृष्ट कुस्ती कौशल्यामुळे रुस्तम-ए-हिंद हा किताब मिळविला आहे. त्यांच्या आक्रमक आणि तंत्रशुद्ध खेळामुळे ते कुस्ती प्रेमींच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत, तर जलाल इराण आंतरराष्ट्रीय पैलवान आहे. त्याने आपले कसब दाखवत अनेक स्पर्धा जिंकत आतंरराष्ट्रीय खेळाडू म्हणून ख्याती मिळवली आहे. पैलवान अमेघा घरत (पनवेल) महाराष्ट्रातील एक प्रतिभावान महिला कुस्तीपटू आहे. तिने राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि महाराष्ट्र चॅम्पियन हा किताब मिळविला आहे. त्यांच्या मेहनतीमुळे त्या महिला कुस्ती क्षेत्रात एक उभरती तारा म्हणून ती ओळखली जाते, तर पैलवान अंकिता फातले ही कोल्हापूरमधील एक कुशल महिला कुस्तीपटू आहेत. त्यांनी विविध स्पर्धांमध्ये आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले आहे आणि महाराष्ट्र चॅम्पियन हा किताब मिळविला आहे. त्यांच्या आक्रमक खेळामुळे त्या प्रतिस्पर्ध्यांसाठी आव्हान देत असतात. अशा दिग्गज पैलवानांचा या कुस्ती स्पर्धेत सहभाग होता.

Check Also

भिंगारी संघाने जिंकला नमो क्रिकेट चषक

पनवेल : रामप्रहर वृत्तनमो चषक 2025 अंतर्गत खारघर येथे झालेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत भिंगारी …

Leave a Reply