पेण : प्रतिनिधी
बारावीच्या परीक्षेच्या ऑनलाइन निकाल जाहीर झाला असून त्यात पेण तालुक्याचा निकाल 87.57 टक्के लागला आहे. तालुक्यातील 1805 विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले होते. त्यापैकी 1803 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामधून 1579 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यामध्ये पेण प्रायव्हेट हायस्कुलने सर्वाधिक निकालाची नोंद केली आहे. या प्रशाळेचा कला, वाणिज्य आणि शास्त्र या तिन्ही शाखांचा एकत्रीत निकाल 92.66 टक्के लागला आहे.शास्त्र शाखेमधील 152 पैकी 148 विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्याची टक्केवारी 97.36 टक्के आहे. कला शाखेतील 203पैकी 176 विद्यार्थी तर वाणिज्य शाखेतील 201पैकी 191 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सार्वजनिक विद्या मंदिर ज्युनिअर कॉलेजच्या शास्त्र शाखेमधील 311पैकी 290विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर कला शाखेतील 194पैकी 152विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेत 157 पैकी 143विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या ज्युनिअर कॉलेजच्या तिन्ही शाखांचा सरासरी निकाल 88.36 टक्के लागला आहे. जोहे येथील न्यु इंग्लिष स्कुल प्रशालेच्या ज्युनिअर कॉलेजच्या शास्त्र शाखेचे 143पैकी 134विद्यार्थी उत्तीर्ण झाले . कला शाखेत 155 विद्यार्थी होते त्यापैकी 131 विद्यार्थी उत्तीर्ण झालेे. या दोन्ही शाखांचा एकत्रित निकाल 88.92 टक्के इतका आहे.वडखळ येथील जयकिसान विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेजच्या कला शाखेतील 71पैकी 45विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दादर येथील सुधागड एज्युकेशन सोसायटी कॉलेजच्या कला शाखेतील 50 पैकी 43विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वरसई आश्रम प्रशालेच्या कला शाखेमधील 38 पैकी 33 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एमसीव्हीसी प्रशालेतील 49 पेकी 40 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एमसीव्हीसी ज्युनिअर कॉलेजमधील 79 पैकी 53 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
अंजुमन हायस्कूलमध्ये फातिमा गोठेकर प्रथम
मुरुड : प्रतिनिधी
शहरातील अंजुमन हायस्कूल विज्ञान शाखेचा निकाल 98.78 टक्के लागला असून, 82 पैकी 81 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.या विद्यालयाची फातिमा गोठेकर हिने 78.77 टक्के गुण मिळवून मुरुड तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर उमेमा गजगे हिला (74.62 टक्के) तर नवाल उलडे याला (68 टक्के) गुण मिळाले आहेत.नांदगाव येथील श्री छत्रपती शिवाजी नूतन कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेचा निकाल 57.69 टक्के लागला आहे. येथे श्वेता घाग हिने 66.76 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. नेहा वाडकर हिला 60 टक्के गुण मिळाले असून तिचा द्वितीय क्रमांक आला आहे. तर अनुक्षा काळू हिला 59.38 टक्के गुण मिळाले असून तिचा तृतीय क्रमांक आला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन चेअरमन फैरोज घलटे व मुख्याध्यापक चिंतामणी जोशी यांनी केले आहे.अंजुमन इस्लाम जंजिरा हायस्कूल ज्यनिअर कला शाखेचा निकाल 91 टक्के लागला असून, 81 पैकी 73 विद्यार्थी पास झाले आहेत. आसिया कबले हिचा (82.76 टक्के) प्रथम, सन्ना अन्सारी (76.15 टक्के) द्वितीय तर नादिरा नाखवाजी हिचा (73.38 टक्के) तृतीय क्रमांक आला आहे. मुख्याध्यापक जाहिद गोठेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
राठी स्कुलची 100 टक्के निकालाची परंपरा कायम
रोहे ः प्रतिनिधी
बारावीच्या परीक्षेत येथील जे. एम. राठी इंग्लीश स्कुलने 100 टक्के निकाल लावण्याची परंपरा कायम ठेवली असून, या महाविद्यालयात आर्या दिपक माने (87.38 टक्के) हिने प्रथम, संचिता सुरेश तांडेल (86.46 टक्के) व्दितीय आणि हर्षद सुनिल महाडीक (82.46 टक्के) याने तृतीय क्रमांक मिळविला आहे. एम. बी. मोरे फांऊडेशनच्या धाटाव येथील कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेचा निकाल 100 टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेचा 97.14 टक्के तर विज्ञान शाखेचा 95.24 टक्के निकाल लागला आहे. कला शाखेत स्वप्नाली सदानंद दिवेकर (60.61 टक्के) हिने प्रथम, सिध्दी नरेश तुलसुनकर (59.38 टक्के) हिने द्वितीय तर अंकिता चंद्रकांत कराले (59.07 टक्के) हिने तृतीय क्रमांक मिळविला आहे. वाणिज्य शाखेत नवनीता यशवंत भोईर (65.25 टक्के), मैताली प्रदिप देशमुख (63.07 टक्के), निर्माला विठ्ठल अटपाडकर (62.30 टक्के), विज्ञान शाखेत प्राची वामन म्हात्रे (65.84 टक्के), रिना राम नवसे (56.15 टक्के), अनुजा रविंद्र मोरे (55.84 टक्के) यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले आहेत. कोकण एज्युकेशन सोसायटीच्या मेहेंदळे कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेचा निकाल 58.67 टक्के, विज्ञान शाखेचा 83.95 टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल 88.60 टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेत 77 पैकी 67 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम क्रमांक वैष्णवी अजय दिवकर (78 टक्के), व्दितीय क्रमांक नेहा नथुराम वाघरे (71.53 टक्के), तृतीय क्रमांक सिध्दी सुहास जांभळे (71.38 टक्के) मिळविला आहे. विज्ञान शाखेचे 81 पैकी 68 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेत प्रथम क्रमांक सलहा रिजवान नाडकर (72 टक्के), शुभम भाऊसाहेब धोत्रे (68.46 टक्के) व तृतीय क्रमांक अतिफ अस्लाम बडे (66 टक्के) यांनी प्राप्त केला आहे.
मोर्बा ज्युनिअर कॉलेजचे 80 विद्यार्थी उत्तीर्ण
माणगांव : प्रतिनिधी
फेबु्रवारी 2019 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि. 28) ऑनलाईन जाहिर झाला. या परीक्षेत मोर्बा (ता. माणगाव) येथील एस. एस. ज्युनिअर सायन्स कॉलेजचा निकाल 98.76 टक्के टक्के लागला असून, तनझील नुरुद्दीन राऊत (78 टक्के) हिने कॉलेजमध्ये प्रथम येण्याचा मान पटकाविला. तर जरीन जुबेरअहमद मुल्ला (74 टक्के) आणि नुझा शमसुलहुदा फिरफीरे (73 टक्के) यांनी अनुक्रमे दूसरा व तिसरा तृतीय क्रमांक मिळविला. या कॉलेजमधून 12 वीच्या परीक्षेसाठी एकूण 81 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 80विद्यार्थी उत्तीर्ण झाले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सैफुद्दीन धनसे, सेक्रेटरी अस्लम राऊत, शाळा समिती चेअरमन हुसेनभाई हर्णेकर, प्राचार्य खालीद खान, प्रशासन अधिकारी आसफ पल्लवकर, पर्यवेक्षिका शमसुनिसा गंग्रेकर यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील शैक्षणीक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पेण सार्वजनिक विद्यामंदिरचा बारावीचा निकाल 88.36 टक्के
पेण : प्रतिनिधी
महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या पेण येथील सार्वजनिक विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल 88.36 टक्के लागला आहे. या ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान शाखेचा निकाल 93.24 टक्के लागला असून विज्ञान शाखेत अमिषा शिवसजन कान्हेकर (94.30 टक्के), अप्षा अंजूम इस्तियाक खान (92.61 टक्के ), डेसिक जॉनी डिसोजा (90.61 टक्के) हे विद्यार्थी गुणानुक्रमे पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. तसेच या ज्युनिअर कॉलेजच्या वाणिज्य शाखेचा निकाल 91.08 टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेमध्ये सिमरन विवेक समेल(84.00 टक्के) प्रथम, राज शाम घरत (80.46 टक्के) द्वितीय, सायली संदेश भोईर (71.69 टक्के) तृतिय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.या ज्युनिअर कॉलेजच्या कला शाखेचा निकाल 78.35 टक्के लागला असून त्यामध्ये हर्षला विलास घाडगे ही 84.92 टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. तर नेहा जनार्दन पाटील ही 72.92 टक्के गुण मिळवून द्वितीय व नंदिता कुमार मोकल ही 70.00 टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे.
चौक विद्यालयाचा निकाल 73.58 टक्के
खालापूर : प्रतिनिधी
तालुक्यातील चौक येथील यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल 73.57टक्के लागला आहे. या कनिष्ठ महाविद्यालयात कला व वाणिज्य या दोन शाखा आहेत.कला शाखेचा 64.17 टक्के तर वाणिज्य शाखेचा 82.19टक्के निकाल लागला असून, दोन्ही शाखेतून 140 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. वाणिज्य शाखेत सानिया दिवाण (76.15टक्के), माधुरी राणे (71.38टक्के) व निशा पवार (69.23टक्के) गुण मिळविले आहेत. त्यांनी महाविद्यालयात गुणानुक्रमे पहिले तिन क्रमांक मिळविले आहेत. कला शाखेत अनिकेत भालेकर (67.38टक्के), प्राची मुकादम (64.61टक्के), अस्मिता डुकरे (58.92टक्के) यांनी पहिले तीन क्रमांक पटकावले.