Sunday , October 1 2023
Breaking News

पाकिस्तानात जाणारे पाणी रोखणार ः ना. नितीन गडकरी

नवी दिल्ली : पुलवामातील आत्मघाती दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची कोंडी करण्याचे प्रयत्न अधिक तीव्र केले आहेत. पाकिस्तानात जाणारे भारतातील व्यास, रावी आणि सतलज नद्यांचे पाणी रोखण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, या तीन्ही नद्यांवर उभारलेल्या प्रकल्पांच्या माध्यमातून आता पाकिस्तानला दिले जाणारे पाणी पंजाब आणि जम्मू-काश्मीरच्या नद्यांमध्ये प्रवाहित केले जाईल. जम्मू-काश्मीरमधील शाहपूर-कांडी येथे रावी नदीवर प्रकल्पाचे निर्माण कार्य सुरू झाले आहे. याव्यतिरिक्त उझ प्रकल्पाच्या मदतीने जम्मू-काश्मीरमधील रावी नदीचे पाणी साठवले जाईल आणि या धरणाचे अतिरिक्त पाणी अन्य राज्यात प्रवाहित केले जाईल, अशी माहिती ना. गडकरी यांनी दिली.

Check Also

रायगडात अन्न व औषध प्रशासनाचे धाडसत्र

26 लाख 81 हजारांच्या माल जप्त; परवाना रद्दचीही कारवाई पेण ः प्रतिनिधी गणेशोत्सवादरम्यान सर्व पदार्थ …

Leave a Reply