Breaking News

उरणमधील नवघर, कुंडेगावात शिरले उधाणाचे पाणी

जेएनपीटी : प्रतिनिधी

समुद्राच्या भरतीचे खारे पाणी उरण तालुक्यातील कुंडेगाव, नवघर, फुंडे, भेंडखळ गावांतील अनेक घरात शिरल्याची घटना बुधवारी (दि. 20) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. कुंडेगाव तर समुद्राच्या पाण्यात बुडाल्याने ग्रामस्थांना रात्र घरातील पाणी उपसण्यात आणि थंडीत कुडकुडत जागून काढावी लागली.

महसूल अधिकार्‍यांनी समुद्राचे पाणी शिरलेल्या गावांची आणि आर्थिक नुकसान झालेल्या घरांची पाहणी करून पंचनामे तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे, अशी माहिती उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे यांनी दिली. पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच नेमका नुकसानीचा आकडा सांगता येईल, असे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply