पनवेल : वार्ताहर
आझाद ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्था, खांदा कॉलनी ही विविध स्तरावर अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते. याचाच एक भाग म्हणून वर्षभरातील विविध कार्यक्रमांचा लेखाजोखा म्हणून दरवर्षी स्मरणिका तयार केली जाते. या स्मरणिकेचे प्रकाशन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे सल्लागार व प्रभाग समिती ब चे सभापती संजय भोपी, प्रभाग क्र. 15चे अध्यक्ष शांताराम महाडिक, तसेच संस्थेचे सचिव कृष्णा पाटील, उपाध्यक्ष दत्तात्रय गवळी, उपसचिव नारायण पंडित, खजिनदार लक्ष्मण कुंभार, उपखजिनदार रामचंद्र ढाणे, कार्यकारी अध्यक्ष विलास काळण, सभासद रमाकांत भगत, भैरू कांबळे, शंकर आगवणे, मधुकर खुडे, विठोबा बनसोडे, पांडुरंग पवार, शिलवंत चौधरी, चित्रे सर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आझाद ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्थेस स्मरणिका व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व भविष्यात संस्थेस सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.