Breaking News

उरण पंचायत समितीमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

उरण : रामप्रहर वृत्त

21 जून रोजी साजरा करण्यात येणारा आंतरराष्ट्रीय योग दिन पंचायत समिती उरण येथील सभागृहात झाला. यावेळी पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर, गट विकास अधिकारी नीलम गाडे, पतंजली परिवाराचे योग प्रशिक्षक केशव म्हात्रे, दर्शना जोशी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी जितेंद्र चिर्लेकर, श्रीमती फड, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे तालुका अभियान व्यवस्थापक ज्ञानेश्वर महाले, तसेच अन्य कर्मचारी आणि महिला स्वयंसहायता समूहाच्या महिलांसहित समुदाय संसाधन व्यक्ती, बँकसखी आदी उपस्थित होते. सदर योग दिन साजरा करताना योगप्रशिक्षक केशव म्हात्रे व दर्शना जोशी योगाचे महत्त्व सांगत सातत्याने योग केल्याने आपल्यामध्ये शारीरिक व मानसिक बदल कसे होतात ते सांगितले, तसेच प्राणायाम व काही आसनांची प्रात्यक्षिकासह माहिती सांगितली. कमरेचे, मानेचे, मणक्याचे, पोटाचे अपचनाचे विकार असतील, तर कोणते आसन करावे याबाबत प्रात्यक्षिक दाखवले, तसेच केवळ 21 जूनच नाही, तर आयुष्यभर योग केले पाहिजेत, असे आवाहन केशव म्हात्रे यांनी केले. योग दिन यशस्वी करण्याकरिता कनिष्ठ सहाय्यक युवराज पाटील, प्रभाग समन्वयक तेजस म्हात्रे, प्रीतम सुतार व कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply