Breaking News

सारडे विकास मंचाने राबविली ‘एक कुटुंब एक झाड’ संकल्पना

उरण : वार्ताहर

एक कुटुंब एक झाड या संकल्पनेतून निसर्गाच्या  संवर्धनाचा वसा घेतलेल्या सारडे विकास मंचकडून  दिनांक रविवारी (दि. 23) सारडे आणि वशेणी या गोवा महामार्गावर वृक्ष लागवड करण्यात आली. निसर्गाचे संवर्धन व्हावे आणि रस्त्यावरच्या वाटसरूंना  कालांतराने त्याची सेवा मिळावी म्हणून अशा प्रकारची वृक्षलागवड करण्यात आली. खरेच अशा प्रकारचा उपक्रम केल्याने याचा समाजासाठी निश्चित फायदा होईल. सोबतच कोमनादेवी परिसरातही वृक्ष लागवड करण्यात आली. वृक्ष लागवड उपक्रमासाठी वशेणीचे माजी सरपंच प्रसाद पाटील यांनी 50 झाडे भेट दिली. या उपक्रमात विविध संघटनांनी सहभाग घेतला, केअर ऑफ नेचर, निगा फाऊंडेशन आवरे, गोल्डन ज्युबली मित्र मंडळ सारडे, तसेच  वृक्षारोपणासाठी रोटरी क्लब पनवेल सनराइजचे अध्यक्ष राजू मुंबईकर, ओम साई इंटरप्राइजेसचे महेश कडू, सह्याद्री प्रतिष्ठानचे अक्षय कोळी, उपसरपंच श्यामकांत पाटील वशेणीचे माजी सरपंच प्रसाद पाटील, दिनेश पाटील, अजय शिवकर, निगा फाऊंडेशनचे नीलेश गावंड, निवास गावंड, पत्रकार सुभाष कडू, विठ्ठल ममताबादे, माधव म्हात्रे, अबा पाटील, अनिल घरत, सतीश पाटील, दिनेश म्हात्रे, ननवीत पाटील, संपेश पाटील, रोशन पाटील, रोहित पाटील, नितेश गावंड, दीपक पाटील, शक्ती वर्तक, कांतिलाल म्हात्रे, सुयोग म्हात्रे, प्रतिश म्हात्रे व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेंद्र म्हात्रे यांनी केले आणि आभार कौशिक ठाकूर यांनी मानले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply