Breaking News

आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रकला स्पर्धा

उरण : वार्ताहर

आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त उरण तालुकास्तरीय ऑनलाइन चित्रकला स्पर्धा शनिवारी (दि. 10) आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमाचे आयोजक भाजप उरण मंडल सांस्कृतिक सेल होते. स्पर्धेचे उद्घाटन भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर यांच्या हस्ते झाले.

या वेळी नगरध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, नगरसेवक राजेश ठाकूर, माजी नगरसेवक राजेश कोळी, सुरज ठवले, मनोहर जामकर, मकरंद पोतदार, अशोक म्हात्रे, विशाल पाटेकर, निखील म्हात्रे, हर्षदा माळी, बदल म्हात्रे, सनी पाटील, अवि जैन आदी उपस्थित होते.

एकूण तीन गटांमध्ये स्पर्धेसाठी 126 स्पर्धकांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 84 स्पर्धकांनी भाग घेतला. स्पर्धेचा निकाल मंगळवारी (दि. 13) जाहीर केला जाईल. विजेत्या स्पर्धकांनी काढलेली चित्रे गुरुवारी (दि. 15) उरणमधील कुंभारवाडा रोड येथील मंगलमुर्ती अपार्टमेंट, सी-14 येथे जमा करावीत. अधिक माहितीसाठी मनोहर जामकर (9757165263) यांच्याशी संपर्क साधावा. विजेत्या चित्रकारांना बक्षिस समारंभची तारीख कळविण्यात  येईल असे आयोजकांनी सांगितले आहे.

उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक संयोजक अशोक धनाजी म्हात्रे, सदस्य विशाल पाटेकर सदस्य, निखील म्हात्रे, हर्षदा माळी, मकरंद पोतदार, बादल म्हात्रे, सनी पाटील, अवि जैन आदींनी मेहनत घेतली.

Check Also

पनवेल महापालिकेचा 3991 कोटी 99 लाखांचा शिलकी अर्थसंकल्प सादर

पनवेल ः प्रतिनिधी महिला सशक्तीकरणाला प्राधान्य देणार्‍या 3991 कोटी 99 लाख रुपयांच्या सन 2024-25च्या पनवेल …

Leave a Reply