पनवेल : बातमीदार : पोलीस ठाण्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर वाहन उभे करून पोलिसांच्या वाहनांना अडथळा निर्माण करणार्या महिलेवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली असता या महिलेने पोलिसांशी हुज्जत घालून महिला पोलिसाला धक्काबुक्की केल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. आरती शंकर तेजा असे या महिलेचे नाव असून कामोठे पोलिसांनी या महिलेवर सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तिला अटक केली. न्यायालयाने या महिलेची जामिनावर सुटका केली आहे. या घटनेतील महिला आरती तेजा ही कळंबोली सेक्टर-1मध्ये राहण्यास असून शुक्रवारी दुपारी ती कामानिमित्त कामोठे येथे आली होती. या वेळी तिने आपली ईको कार कामोठे पोलीस ठाण्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उभी केली. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पीटर मोबाइल वाहन घेऊन पोलीस तेथे आले होते. मात्र गेटसमोरच कार उभी असल्याने पीटर मोबाइल वाहन घेऊन जाता आले नाही. त्यामुळे पोलिसांनी इको कारचालक आरती तेजा हिच्यावर कारवाई करण्यासाठी तिचे लायसन्स घेऊन तिला पोलीस ठाण्यात आणले असता तिने ठाणे अंमलदारांसोबत हुज्जत घातली.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …