नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी या दोघांच्या साथीने तो भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीचा मोर्चा सांभाळत आहे. अंतिम टप्प्यात फलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून बुमराहच्या यॉर्करची ओळख आहे. याच यॉर्करबद्दल जसप्रित बुमराहने काही रंजक किस्से सांगितले आहेत.
‘मी लहानपणी अंगणात खेळायचो, तेव्हा मी कायम यॉर्क चेंडू टाकायचो. मला फारसे समजत नसतानाही मी यॉर्कर चंदू टाकण्याचाच सराव करत असायचो. याचे कारण म्हणजे टीव्हीवर मी जेव्हा क्रिकेटचे सामने पाहायचो तेव्हा त्यात एक गोष्ट मला जाणवायची ती म्हणजे गोलंदाजाने यॉर्कर चेंडू टाकला की फलंदाज निरुत्तर होतो आणि गोलंदाजाला यश मिळते. त्यामुळे माझ्या मनात असे समीकरणच तयार झाले.