Breaking News

पर्यावरणप्रेमी योगेश पगडे यांना कासाडी नदीच्या स्वच्छतेसाठी होडी भेट

रसायनी ः वार्ताहर – पर्यावरणप्रेमी योगेश पगडे हा स्वयंप्रेरणेने कासाडी नदीचे पात्र स्वत: मेहनत करून वर्षभर स्वच्छ करीत असतो. स्वतःजवळ होडी व आवश्यक साधनसामग्री नसताना केवळ पर्यावरण संवर्धनासाठी तो हे काम करतो. त्याच्या कार्याची दखल तळोजा पर्यावरण विभागाचे सुनिल भोईर यांनी घेऊन एमआयडीसीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीकडे होडीची मागणी केली. अखेर सुनील भोईर यांच्या प्रयत्नाला यश येऊन योगेशला होडी भेट देण्यात आली. यावेळी कासाडी नदीच्या काठावर मान्यवरांच्या हस्ते विविध जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

तळोजा हा औद्योगिकीकरणाने नटलेला भाग आहे. या वाढत्या औद्योगिकीकरणाच्या कचाट्यात सापडलेल्या कासाडी नदीपात्रात साचलेला प्लास्टिकचा खच, नदीची झालेली दुरवस्था पाहता साफसफाई करण्याचे काम पर्यावरणप्रेमी व मच्छीमार योगेश पगडे हा करीत आहे. योगेशचे पर्यावरण संवर्धनाचे काम पाहून तळोजा काँग्रेस सेलचे पर्यावरण अध्यक्ष सुनील भोईर यांनी मु़ंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीकडे होडीची मागणी केली होती. कंपनीने आपल्या फंडातून योगेशला होडीची व्यवस्था करुन दिली.एका छोटेखानी कार्यक्रमात कंपनीचे डायरेक्टर  सोमनाथ मालगार यांच्या हस्ते योगेशला ही होडी भेट देण्यात आली.

यानंतर उपस्थित मान्यवरांनी होडीचे पूजन करुन कासाडी नदी काठावर वृक्षारोपण केले. यावेळी तळोजा एमआयडीसीचे उपअभियंता दीपक बोबडे-पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हेमराज म्हात्रे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष जीवन गायकवाड, तळोजा पर्यावरणाचे अध्यक्ष सुनिल भोईर, भीमशक्ती संघटनेचे तालुकाध्यक्ष सुभाष गायकवाड, कोळीबांधव उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply