Breaking News

कळंबोलीत मंगळागौर कार्यक्रम उत्साहात

कळंबोली : रामप्रहर वृत्त

कळंबोली सेक्टर 10 इ रोडपाली येथील वेरोना सोसायटीत गणेशोत्सवाचे यंदाचे पाचवे वर्ष आहे. मागील दोन वर्षे कोरोना काळात गणेशोत्सव जल्लोषात साजरा करता आला नाही. यावर्षी मात्र सोसायटीच्या महिलांनी विविध कार्यक्रम राबवण्याचे ठरवुन उत्सवात जोश निर्माण केला आहे. त्याचाच एक भाग म्हणुन सोसायटीच्या महिलांनी मंगळागौर व विविध पारंपरिक नृत्यांचे आयोजन केले होते. मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन प्रथमच कळंबोलीमध्ये वेरोना सोसायटीत करण्यात आले, तसेच बाल कलाकारांच्या विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. जल्लोषात या वर्षीचा गणेशोत्सव साजरा करत असल्याचे सोसायटीतील महिलांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी प्रमुख म्हणून स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या अध्यक्ष विजया कदम यांनी उपस्थिती लावली, असे वेरणा सोसायटीचे सेक्रेटरी रोहन गायकवाड यांनी सांगितले. बक्षीस वितरणही विजया कदम यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन दीपक गोंधळी यांनी केले. हा कार्यक्रम सोसायटी कमिटीच्या सदस्यांच्या तसेच सोसायटीच्या महिलांच्या यांच्या सहकार्याने झाला व त्यातील महिलांपैकी विभा गायकवाड व आर्या कदम यांनी मंगळागौरबद्दल त्यांचे मनोगत व्यक्त केले.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply