Breaking News

अमूलकडून विराटला आशीर्वाद देणार्या आजींचा गौरव

मुंबई : प्रतिनिधी

बांगलादेश आणि भारत यांच्यातला सामना सुरू होता तेव्हा, भारत जिंकावा म्हणून मी गणपतीची प्रार्थना केली होती असे या आजी म्हणाल्या. त्या पिपाणी वाजवून भारतीय संघाला चिअर करत होत्या. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनीही त्यांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले. चारुलता पटेल असे या 87 वर्षीय आजींचे नाव आहेत. त्या मूळच्या टांझानियाच्या आहेत. त्यांचे आई-वडील भारतात राहत होते. त्यामुळे भारताबाबत त्यांना अभिमान आहे.

चारूलता पटेल या 87 वर्षांच्या आजी बांगलादेशविरूद्धच्या सामन्या दरम्यान पिपाणी वाजवून आणि भारतीय झेंडा खांद्यावर घेऊन टीम इंडियाला चिअर करीत होत्या. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची चांगलीच चर्चा रंगली होती.

विराट माझ्या पाया पडला

विराट आणि रोहित मला सामन्यानंतर भेटायला आले तेव्हा मला खूप छान वाटले. माझ्याशी हस्तांदोलन केले, माझ्या पाया पडले दोघेही. मी व्हिलचेअरवरुन उठू लागले तर विराटने नाही नाही आजी तुम्ही बसा असे सांगितले. तो माझ्याशी बोलण्यासाठी खाली बसला. विराट माझ्या पाया पडला. मी त्या दोघांच्या डोक्यावर हात ठेऊन त्यांना आशिर्वाद दिला.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply