Breaking News

नेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली

कर्जत : बातमीदार – नेरळ-माथेरान घाटात सतत दरडी कोसळत असून, या पावसाळ्यात शुक्रवारी (दि. 26) तिसर्‍यांदा दरड कोसळली. दरम्यान, याच घाटरस्त्यात गुरुवारी जुने झाड रस्त्यावर पडल्याने घाटरस्ता बंद पडला होता.

तीन दिवसांपासून माथेरान परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. पावसाच्या संततधारेमुळे नेरळ-माथेरान घाटरस्त्यात डोंगरातून दगड, माती सोबत वाहून रस्त्यावर येत आहेत. फार कमी दिवस पडलेल्या पावसाळ्यातील या हंगामात तब्बल तीनवेळा घाटरस्त्यात दरडी कोसळल्या आहेत. गुरुवारी घाटरस्त्यात जुम्मापट्टी येथे जुने झाड रस्त्यावर कोसळल्याने घाट रस्ता बंद पडला होता. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास घाटरस्त्यात दरड कोसळली. घाटात तीन रस्ता येथे कडेला असलेली दरड मातीसह खाली रस्त्यावर आल्याने घाटरस्त्यातील वाहतूक बंद पडली.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply