माणगाव ः प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावर माणगावजवळील तिलोरे गावच्या हद्दीत भरधाव कंटेनरची धडक बसून दुचाकीस्वार दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (दि. 15) मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातातील फिर्यादी राजेंद्र गंगाराम राइका हे त्यांच्या ताब्यातील कार चालवित असताना माणगावकडून येणार्या एका कंटेनरच्या (एमएच 46-बीएम 0676) चालकाने माणगाव बाजूकडे जाणार्या मोटरसायकलला (एमएच-02 इजी 1385) आपल्या वाहनाची धडक दिली. या अपघातात मोटरसायकलवरील विशाल संजय सकपाळ (वय 34, रा. दिवा, जि. ठाणे) व राजेश राजाराम धामणकर (वय 30, रा. खार, मुंबई) या दोन तरुणांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात येऊन कंटेनरवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …