Breaking News

उरणमध्ये गरजू मजुरांना अन्नधान्याचे वाटप

उरण : वार्ताहर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात उपाशी राहू नये या दृष्टीकोनातून श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था कोप्रोलीच्या माध्यमातून उरण तालुक्यातील गरजू मजूरांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

उरण-पनवेल मार्गांवर जेएनपीटी टाऊनशिप बस स्टॉप ते नवघर फाटा बस स्टॉपदरम्यान मुख्य रस्त्याला लागून असलेल्या झोपडपट्टीवासीय हे मोलमजुरी करतात. कडक निर्बंधाच्या काळात त्यांना हालाखीचे जीवन जगावे लागत आहे. झोपडपट्टीत राहणार्‍या एकूण 23 कुटुंबांना प्रत्येकी तीन किलो तांदूळ, दोन किलो गहू, एक किलो कांदे, असे जीवनावश्यक अन्नधान्य प्रत्येकाला देण्यात आले.

या वाटपाच्या वेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष व पत्रकार विठ्ठल ममताबादे, सामाजिक कार्यकर्ते महेश पाटील, विकी पाटील युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकी पाटील, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे सदस्य प्रेम म्हात्रे, समीर पाटील, अभय पाटील, साहिल म्हात्रे, ओंमकार म्हात्रे, आर्यन पाटील, अर्णव पाटील आदी सदस्यांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून अन्नधान्य वाटपक केले. कामगार वर्गाने संस्थेचे आभार मानले.

Check Also

पेणमध्ये भाजपचा बूथ मेळावा उत्साहात

पेण ः रामप्रहर वृत्त रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.14) पेण तालुक्यात भाजपच्या बूथ मेळाव्याचे …

Leave a Reply