Breaking News

कराटे प्रात्यक्षिक परीक्षा

पेण ः प्रतिनिधी
युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशनच्या विद्यमाने पेण येथे कराटे प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली. परीक्षेस 125 विद्यार्थी बसले होते. परीक्षा युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशनचे अध्यक्ष रेन्शी, डॉ. मंदार पनवेलकर, उपाध्यक्ष शिहान म्हात्रे (पप्पू सर) यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. परीक्षेस परीक्षक म्हणून सेन्साय साठे, आदित्य तेरेदेसाई, किरण चव्हाण, आदित्य पाटील, रोहित भोसले, प्राजक्त तेटमे, प्रथमेश मोकल, रविना म्हात्रे, निलेश ओव्हाळ यांनी काम पाहिले. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बेल्ट देऊन सन्मानित करण्यात आले.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply