Thursday , March 23 2023
Breaking News

र्होडियो कंपनी कामगारांचे उपोषण तिसर्या दिवशीही सुरू

विविध कामगार संघटनांचा पाठींबा

रोहे ः प्रतिनिधी

धाटाव औद्योगिक क्षेत्रातील र्‍होडियो (सॉल्वे) कंपनीच्या  कामगारांना व्यवस्थापनाने कामावरून काढून टाकले आहे. या कामगारांनी कामावर पुन्हा घ्यावे, या मागणीसाठी 22 फेब्रुवारीपासून कंपनीच्या प्रवेद्वारासमोर साखळी उपोषण सुरु केले आहे. मात्र कंपनी व्यवस्थापनाने त्याची दखल न घेतल्याने तिसर्‍या दिवशीही कामगारांचे साखळी उपोषण सुरूच आहे. दरम्यान, या औद्योगिक क्षेत्रातील विविध कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी साखळी उपोषणास पाठींबा दिला आहे.

व्यवस्थापनाने काढून टाकल्याने -होडियो (सॉल्वे) या कंपनीतील कामगार गेली वर्षभर कंपनीच्या बाहेर आहेत. आपल्याला कामावर घ्यावे, या मागणीसाठी या कामगारांनी साखळी उपोषण सुरु केले आहे. व्यवस्थापनाने या प्रकरणी तोडगा न काढल्यास आमरण उपोषण करण्याच्या तयारीत हे कामगार आहेत.

डॉक्टर भुलला स्वस्त सोन्याला

Check Also

अलिबाग-रोहा रस्त्याच्या कामाला सुरुवात

आमदार प्रशांत ठाकूर, महेंद्र दळवी यांचा पाठपुरावा अलिबाग ः प्रतिनिधी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बुधवारी (दि. 22) …

Leave a Reply