पनवेल : रामप्रहर वृत्त
उत्तर रायगड जिल्हा ओबीसी मोर्चा सरचिटणीस दशरथ म्हात्रे यांचे सुपुत्र आर्यन दशरथ म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आसुडगाव येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि गणवेश वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि पनवेल महानगर पालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि गणवेश वाटप करण्यात आले.या वेळी पनवेल विधानसभा निवडणूक प्रमुख तथा माजी नगरसेवक नितीन पाटील, शशिकांत शेळके, भाजप कार्यकर्ते दशरथ म्हात्रे, मनोहर म्हात्रे, संज्योत शेळके, पवन शेळके, अशोक हुद्दार, बाळा नाईक, रमेश नाईक, विवेक होन, मोतीराम कोळी, मुख्याध्यापिका जयश्री मुंडे यांच्यासह शिक्षकवृंद आणि मान्यवर उपस्थित होते.
Check Also
खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयाला ’नॅक’ची ए श्रेणी प्राप्त
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर …