Breaking News

भाजप पदाधिकार्यांना नियुक्तिपत्रे प्रदान; सामाजिक कार्यकर्ते सुयोग साखरे यांचा पक्षप्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्ष पनवेल शहर मंडलच्या विविध कार्यकारिण्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या नवनियुक्त पदाधिकार्‍यांना भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 23) नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते सुयोग साखरे यांनी या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला. पनवेल येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास भाजप प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुनील घरत, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, प्रभाग समिती ‘क’ सभापती हेमलता म्हात्रे, प्रभाग ‘ड’ सभापती सुशीला घरत, नगरसेवक नितीन पाटील, मनोज भुजबळ, नगरसेविका चारुशीला घरत, राजश्री वावेकर, रूचिता लोंढे भाजप पनवेल शहर सरचिटणीस अमरिश मोकल, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप आदी पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी भाजप पनवेल शहर मंडल अंतर्गत महिला मोर्चा, युवा मोर्चा, ओबीसी मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा, अनुसूचित जाती मोर्चा, अनुसूचित जमाती मोर्चा, किसान मोर्चा, झोपडपट्टी सेल, कामगार सेल, उद्योग सेल, उत्तर भारतीय सेल, दक्षिण भारतीय सेल, भटके विमुक्त सेल, वैद्यकीय सेल, कायदा सेल, सहकार सेल, मच्छीमार सेल, सोशल मीडिया सेल, माजी सैनिक सेल, ज्येष्ठ कार्यकर्ता सेल, दिव्यांग सेल, शिक्षक सेल, सांस्कृतिक सेल अशा विविध कार्यकारिण्यांतील नवनियुक्त पदाधिकार्‍यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते सुयोग साखरे यांचे भाजपमध्ये स्वागत करण्यात आले.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply