Breaking News

पनवेलमध्ये तीन, तर घणसोलीत दोन वीज उपकेंद्र ; महावितरणचे स्तुत्य पाऊल

पनवेल : बातमीदार

पनवेल शहर व आजूबाजूच्या परिसरात महावितरणच्या ग्राहकांना योग्य दाबाचा व अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी महावितरण व महापारेषणातर्फे विविध कामे करण्यात येत आहेत. यामध्ये महापारेषणतर्फे 220 केव्ही टिंबरमार्केट उपकेंद्र, पनवेल शहर येथे, तसेच महावितरणतर्फे 33 केव्ही टपालनाका उपकेंद्र व 33 केव्ही सुकापूर उपकेंद्र नवीन पनवेल या भागामध्ये उभारण्यात येत आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या एका महिन्यात ही दोन्ही उपकेंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहेत. त्यामुळे पनवेल शहराचा वीजपुरवठा अखंडित राहण्यास मदत होणार आहे.

पनवेल शहराच्या आजूबाजूच्या परिसरासाठी 33 केव्ही नेरा उपकेंद्र व 33 केव्ही गवाण फाटा उपकेंद्राची कामेसुद्धा हाती घेतली असून, तीसुद्धा येत्या दोन महिन्यांत सप्टेंबर 2019 अखेरीस पूर्ण करून कार्यान्वित करण्यात येणार आहेत. त्यामुळे पनवेलच्या आजूबाजूच्या परिसरातील उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे. घणसोली व ऐरोली येथील वीजपुरवठा अखंडित राहण्यासाठी नव्याने 22 केव्ही घणसोली उपकेंद्र मंजूर झाले असून कामाचे आदेशही देण्यात आले आहेत. या उपकेंद्रांच्या कामासाठी लागणारी जागा सिडकोकडून हस्तांतरित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही जागा हस्तांतरित झाल्यानंतर उपकेंद्राचे काम त्वरित हाती घेण्यात येणार आहे. ऐरोली व घणसोली या परिसरातील ओव्हर लोडिंगच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी या भागामध्ये नव्याने अडीच किमी. लघुदाब केबल 300 मिमी विविध ठिकाणी टाकण्यात आली आहेत. त्यामुळे घणसोली व आजूबाजूच्या परिसरातील वीजपुरवठा अखंडित राहण्यास मदत होणार आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply