Breaking News

खारघर गावात कोविड लसीकरण केंद्र सुरू

नगरसेवक प्रवीण पाटील यांचे प्रयत्न

पनवेल : प्रतिनिधी

खारघर गावात स्थायी समितीचे माजी सभापती व विद्यमान नगरसेवक प्रवीण काळूराम पाटील यांचे प्रयत्नाने शनिवार (दि.21) पासून पनवेल महापालिकेचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.

खारघर गावात कोविड 19 लसीकरण केंद्र नसल्याने तेथील लोकांना खारघर येथे जावे लागत होते. ग्रामीण भागातील लोकांना लासी कारणासाठी ऑनलाइन बुकिंग करतानाही अडचण येत असल्याने त्यांची गैरसोय होत होत्या. नगरसेवक प्रवीण पाटील यांनी याबाबत महापालिका आयुक्तांना पत्र देऊन खारघर गावात लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती.

शनिवारपासून महापालिकेने खारघर गावातील जिल्हा परिषदेच्या शाळते लसीकरण केंद्र सुरू केले. या वेळी  नगरसेवक प्रवीण पाटील, प्रभाग समिती ’अ’च्या सभापती अनिता पाटील, रमेश खडतर, नितीन भगत, बाळकृष्ण पाटील, महापालिकेचे  डॉक्टर व त्यांचा स्टाफ उपस्थित होता.

Check Also

टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोषची कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात निवड

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन अन्‌‍ शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या …

Leave a Reply