कर्जत : बातमीदार
येथील रोटरी क्लबचे अध्यक्ष म्हणून हुसेन जमाली यांची निवड करण्यात आली. कर्जतच्या सीबीसी सभागृहात झालेल्या कार्यक्रमात हुसेन जमाली व क्लबच्या नवीन पदाधिकार्यांनी पदभार स्वीकारला. पदग्रहण सोहळ्यात विविध क्षेत्रांत काम करणार्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. सुरुवातीस मावळते अध्यक्ष रामदास घरत यांच्याकडून हुसेन जमाली यांनी रोटरी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. सामाजिक कार्यकर्ते अशोक जंगले, रक्तदाते राजेश कोठारी, रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवणारे पंकज ओसवाल यांसह दहावी-बारावी परीक्षेत प्रावीण्य मिळवणार्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. रोटरीचे प्रांतपाल प्रमोद जेजुरकर, मावळते अध्यक्ष रामदास घरत, रोटरीचे आशिया खंडप्रमुख गणेश वर्तक, माजी नगराध्यक्ष राजेश लाड, रोटरीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सूर्याजी ठाणगे, डॉ. प्रेमचंद जैन, अरविंद जैन आदी या वेळी उपस्थित होते.