पेण : प्रतिनिधी
येथील नील योगेश वैद्य नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय सेकंड लेझर-रन स्पर्धेत भारतातून प्रथम आला. या कामगिरीमुळे त्याची जागतिक लेझर-रन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा 6 सप्टेंबर रोजी हंगेरीत होणार आहे.
12 वर्षीय नील वैद्य याने किक बॉक्सिंग, कराटे, जलतरण, धावणे या स्पर्धांसाठी आतापर्यंत स्पेन, दुबई, रशिया, श्रीलंका या देशांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
प्रत्येक वेळी परदेशात येण्या-जाण्यासाठी व राहण्यासाठी किमान दोन लाखांहून अधिक खर्च येतो, मात्र नीलची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. त्यामुळे हंगेरीतील स्पर्धेसाठी सामाजिक संस्था, कंपनी, दानशूर मंडळी यांनी सहकार्य करावे, असे आवाहन नीलचे वडील योगेश वैद्य यांनी केले आहे.