Monday , January 30 2023
Breaking News

ऑस्ट्रेलियन ओपनमधून सेरेना विल्यम्स आऊट

मेलबर्न : वृत्तसंस्था
सात वेळा ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद पटकाविणारे अमेरिकेची दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्सला तिसर्‍या फेरीत पराभवाचा धक्का बसला. चीनच्या 28 वर्षीय वांग कियांगने सेरेनाचा पराभव केला आणि स्पर्धेतील पहिल्या धक्कादायक विजयाची नोंद केली.
तब्बल 23 ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवणार्‍या सेरेनाचा तिसर्‍या फेरीत कियांगने 6-4, 7-6(2-7), 7-5 असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत 29व्या स्थानावर असलेल्या कियांगने 2 तास 40 मिनिटात हा सामना जिंकला आणि पुढील फेरीत स्थान मिळवले.
सेरेनाविरुद्धच्या सामन्यात कियांगने पहिल्या सेटमध्ये विजय मिळवला, पण दुसर्‍या सेटमध्ये सेरेनाने कडवी लढत दिली आणि सेट टायब्रेकरमध्ये जिंकला. तिसर्‍या आणि निर्णायक सेटमध्ये कियांगने शानदार खेळ केला आणि 7-5ने विजय मिळवला.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply