इंग्रजीमध्ये एक म्हण आहे ‘हेल्थ इज वेल्थ’. याचा अर्थ आरोग्य हीच खरी संपत्ती! ते खरंच आहे. आरोग्य निरोगी व सुदृढ असेल, तर माणूस काहीही करू शकतो.
हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला दैनंदिन धावपळ करावी लागते. नोकरी-व्यवसायातून कुटुंबाची गुजराण करण्यासाठी कष्ट करावे लागतात, मात्र हे करीत असताना अनेकदा स्वत:च्या शरीराची हेळसांड होते. त्याकडे दुर्लक्ष केल्यास आजार, रोगांना सामोरे जावे लागते. ते टाळण्यासाठी नियमितपणे आरोग्याची तपासणी केली पाहिजे; कारण शरीर साथ देत असेल, तरच पुढे मार्गक्रमण करणे शक्य होते. ज्यांना
पैशांअभावी आपल्या आरोग्याची तपासणी करणे शक्य होत नाही, त्यांना श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणारे आरोग्य महाशिबिर वरदान आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत उपक्रमाचा लाभ घ्यावा.