Breaking News

श्रावणी सोमवारसाठी केगावचे माणकेश्वर मंदिर सज्ज

उरण ः वार्ताहर

अरबी समुद्राचा त्रिवेणी संगम होतो अशा पवित्र ठिकाणी म्हणजेच केगावस्थित उरण तालुक्यात वसलेले माणकेश्वर मंदिर हे शंकराचे स्वयंभू मंदिर आहे. श्रावणी सोमवारसाठी मंदिर व्यवस्थापन सज्ज झाले आहे. सुमारे 400 वर्षांपूर्वी केगाव परिसरातील एक शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करत असताना त्याला आपल्या नांगराच्या फळाला रक्त लागलेले आढळले. त्या शेतात खोदकाम केले असता शेतकर्‍याला शेतात अर्धवट तुटलेल्या अवस्थेत शिवलिंग सापडले. असे तुटलेले व अर्धे शिवलिंग असलेले शंकराचे स्वयंभू मंदिर उरण तालुक्यातच नव्हे, तर अख्ख्या महाराष्ट्रात एकमेव व दुर्मीळ आहे.

2015पासून मंदिराची विश्वस्त कमिटी बदलली असून शैलेश शरद म्हात्रे हे मंदिराचे अध्यक्ष आहेत. दिगंबर हरिभाऊ म्हात्रे हे सचिव असून, रूपेश आत्माराम ठाकूर हे विश्वस्त आहेत. विश्वस्त कमिटी मंदिराचे व्यवस्थापन उत्तमरीत्या सांभाळत आहेत, तसेच दत्तात्रय वामन पाटील मंदिराचे पुजारी आहेत. मंदिर विश्वस्त कमिटीतर्फे दरवर्षी श्रावण महिन्यात चारही सोमवारी मोठा उत्सव साजरा केला जातो, तसेच दिवाळीनंतर त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी  यात्रा असते. महाशिवरात्रीच्या दिवशी मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. या दिवशी उरण तालुक्यासह नवी मुंबई, मुंबई, अलिबाग व संपूर्ण रायगड जिल्ह्यातून हजारो भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात.

Check Also

तळोजा मजकूरमध्ये शिवरायांच्या मंदिराचा वर्धापन दिन

तळोजा : रामप्रहर वृत्ततळोजा मजकूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा पहिला वर्धापन दिन रविवारी …

Leave a Reply