Breaking News

गुळसुंदे येथे जातीचे दाखले वाटप

पनवेल ः वार्ताहर

गुळसुंदे येथे मराठा समाजाच्या जातीच्या दाखल्यांचे वाटप पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या वेळी मराठा समाज समन्वयक विनोद साबळे प्रामुख्याने उपस्थित होते. गुळसुंदे येथे झालेल्या जातीचे दाखले वाटप शिबिरास पनवेल तहसीलचे अधिकारी, प्रभाकर नवाळे, जान्हवी मानकामे (सेतू संचालक पनवेल), सेतू कर्मचारी भाग्यक्षी कांबळे, उज्ज्वला कोनकर, प्रवीण सानप, सारिका ठाकूर, सकल मराठा समाज तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य मनोज पवार, उपसरपंच शांताराम मालुसरे, विभाग अध्यक्ष महादेव कचरे, निवृत्ती मालुसरे, सदस्य वसंत चव्हाण, राजेंद्र दसवंते, नरेश गवस्कर, संदीप दळवी, सचिन मालुसरे, नयन गोळे, मयुर चव्हाण आदी उपस्थित होते. 300च्यावर मराठा समाज बांधवांनी जातीचे दाखले काढण्यासाठी अर्ज दाखल केले होते.

Check Also

परेश ठाकूर यांची महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

पनवेलसह रायगडच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनची (एमबीए) ८४वी चतुर्वार्षिक …

Leave a Reply