पनवेल : रामप्रहर वृत्त
डी कार्यक्रम इव्हेंट मॅनेजमेंट ग्रुपच्या वतीने खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाच्या मैदानात मान्सून कप फुटबॉल स्पर्धा 17 व 18 रोजी आयोजित करण्यात आली आहे.
पनवेल मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पुढाकाराने व रोट्रॅक्ट क्लब ऑफ पनवेल महानगर यांच्या सहकार्याने होणार्या या स्पर्धेत विजेत्या संघाला 25 हजार रुपये, द्वितीय 15 हजार रु., तृतीय क्रमांकास पाच हजार रु. व तिन्ही विजेत्यांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रवेश फी दोन हजार रुपये आहे. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी 9769096956 किंवा 9619091515 या क्रमांकावर संपर्क साधावा.

पनवेल : फुटबॉल खेळाचा अधिकाधिक प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी डी कार्यक्रम इव्हेंट मॅनेजमेंट ग्रुपतर्फे रायगड जिल्हा परिषदेच्या उसर्ली खुर्द येथील शाळेत विद्यार्थ्यांना नुकतेच फुटबॉलचे वितरण करण्यात आले. या वेळी ग्रुपचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.