Breaking News

प्रचारात सोशल मीडियाचा प्रभाव; रायगड शिव युवा सेनेचे फेसबुक पेज खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते प्रकाशन

मोहोपाडा : रामप्रहर वृत्त

निवडणुकीत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे सोशल नेटवर्किंग साईट्स. लोकसभा महासंग्रामातही त्याचा प्रत्यय येत असून, शिवसेनेने रायगड शिव युवा सेनेच्या माध्यमातून फेसबुक पेज काढले आहे. त्याचे प्रकाशन मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि शिवसेना-भाजप-रिपाइं युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील, उपजिल्हाप्रमुख शिरिष घरत, सोशल मीडियाचे युवा सैनिक गणेश थोरवे, स्वप्नील भोवड, रोहन भोईर, अनिकेत जाधव आदी उपस्थित होते. सध्या मोबाईलवर तरुणपिढी उमेदवारांची व प्रचाराची घरबसल्या माहिती घेत असल्याचे दिसून येते. यासाठी उमेदवाराची व त्यांनी केलेल्या कामाची माहिती रायगड शिव युवा सेनेच्या फेसबुक पेजवर लिंक करून प्राप्त करता येईल, असे गणेश थोरवे यांनी या वेळी सांगितले.

Check Also

हम दिल दे चुके सनम @ 25

उत्कंठामय गोष्ट, देखणं सादरीकरण समीर (सलमान खान) भारतीय शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी या कलेतील निष्णात पंडित …

Leave a Reply