Breaking News

कळंबोलीकरांची दुर्गंधीपासून होणार सुटका

मलनिस्सारण वाहिन्या अत्याधुनिक पद्धतीने सफाईचा सिडकोचा निर्णय

कळंबोली : विकास पाटील

कळंबोली वसाहतीतील मलनिस्सारण वााहिन्या सतत तुंबण्याच्या प्रकारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यावर उपाययोजना करताना सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वाहन्या साफ करण्यासाठी हायफ्लो डिसल्डींग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांचे अभिनंदन होत आहे.

कळंबोली वसाहत ही समुद्र सपाटीपासून तीन मीटर खाली असल्याने मलनिस्सारण वाहिन्यांतील घाण पाणी शौचालयावाटे बैठ्या घरात येत असते. त्यामुळे होणार्‍या दुर्गंधीने नागरिक हैराण झाले आहेत. त्यांचे आरोग्य धोक्यात आले असून, काहींनी आपला बोजा बिस्तरा अन्य ठिकाणी बसविला आहे. नागरिकांच्या भावनांचा विचार करून कळंबोली भाजप शहर अध्यक्ष रविशेठ पाटील व कार्यकर्त्यांनी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे या शहरातील मलनिस्सारण वाहिन्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साफ करण्याची मागणी केली होती. त्याला सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंजुरी देत त्या हायफ्लो डिसल्डींगच्या माध्यमातून साफ करण्यात येणार आहेत. 

भाजप नेत्यांच्या मागणीनुसार हायफ्सो डिसल्डिंगच्या माध्यमातून मलनिस्सारण वाहिन्या साफ करण्याचा प्रस्ताव अधीक्षक अभियंता सीताराम रोकडे, कार्यकारी अभियंता गिरिष रघुवंशी यांनी पाठविला असता, त्याला सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंजुरी दिली असून, लवकरच त्याच्या निविदा काढण्यात येतील. त्यामुळे कळंबोलीकरांची दुर्गंधीपासून सुटका होणार आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून, आमदार प्रशांत ठाकूर यांचे अभिनंदन केले आहे.

सुरक्षित प्रणाली

हायफ्सो डिसल्डिंगच्या माध्यमातून 150 केजी प्रेशरने पॉवरफुल व्हॅकुम पोकळी निर्माण करून मलनिस्सारण वाहिनीतून वीटा, माती, गोणी, तसेच वाहिनीत असणारे सर्व टाकाऊ मटेरियल 30 फुटापर्यंत साफ करता येणार आहे. यासाठी वाहिनीत मनुष्यबळ उतरण्याची गरज भासणार नाही. अशा प्रकारे ही प्रणाली सुरक्षितही आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply