Monday , January 30 2023
Breaking News

कळंबोलीत भरदिवसा घरफोडी; तब्बल नऊ लाखांचे दागिने चोरी

पनवेल : वार्ताहर
कळंबोली, सेक्टर-4 ई मध्ये भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल नऊ लाख 12 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. कळंबोली पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. कळंबोली, सेक्टर- 4ई मधील एफ-1 इमारतीत सुळ कुटुंबिय राहत असून सचिन सूळ आणि त्यांची पत्नी राजश्री सुळ दोघेही कामाला आहेत. सचिन सुळ नेहमीप्रमाणे आपल्या कामावर गेले होते. तर राजश्री या आपल्या मुलाला क्लासमध्ये तर मुलीला शाळेत सोडून कामावर गेल्या होत्या. यादरम्यान त्यांचे घर बंद असल्याने चोरट्याने संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून घरातील सोन्याचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल 9 लाख 12 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. दुपारीच्या सुमारास सचिन सुळ यांचे मोठे बंधु त्यांच्या घरी गेले असताना, त्यांना सदर प्रकार निदर्शनास आला. याबाबतची माहिती त्यांनी त्यानंतर सचिन आणि राजश्री यांना दिल्यानंतर त्यांनी आपल्या घराकडे धाव घेतली.
या वेळी घरातील सर्व दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी कळंबोली पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल केली.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply