Breaking News

भारतीय जनता पक्षाकडून धरणा कॅम्प येथे अन्नधान्याचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोरोना पार्श्वभूमीवर माजी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने गोरगरिबांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे.

यामध्ये मौजे धरणा कॅम्प (करंजावडे) येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लॉकडाऊनच्या विळख्यात अडकलेल्या गोरगरीबांना गणेशोत्सव आनंदात साजरा करता यावा म्हणून रवा, मैदा, चणाडाळ, डाळडा, साखर, व गुळ असे फराळाच्या पदार्थांचे वाटप करण्यात आले. या वेळी वॉर्ड अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे, सोशल मिडीया संयोजक पनवेल रामचंद्र शेलार व हेमंत पवार, तळोजा विभाग चिटणीस सतीश कदम, बुथ प्रमुख शेखर कदम, महेश कदम व इतर गाव प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

Check Also

करंजा बंदराच्या विकासाला १८० कोटींचे भक्कम पाठबळ!

मच्छीमार बांधवांचे हित आणि उरणच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य ः आमदार महेश बालदी उरण : रामप्रहर …

Leave a Reply